इराण–इस्रायल संघर्षाचा बाजारावर परिणाम; कच्चे तेल महाग, निफ्टी-सेन्सेक्स कोसळले

 इराण–इस्रायल संघर्षाचा बाजारावर परिणाम; कच्चे तेल महाग, निफ्टी-सेन्सेक्स कोसळले

जितेश सावंत

गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेचा यात झालेला हस्तक्षेप यामुळे जगभरातील वित्तीय बाजार ढवळून निघाले आहेत. या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसत असून, शुक्रवारी भारतीय निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवली आहे.जागतिक राजकारणातील याच वाढत्या तणावामुळे आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील शेअर बाजारात देखील या आठवड्यात मोठा भूकंप पाहायला मिळाला. शुक्रवारी अमेरिकन बाजारसुद्धा (US Market) मोठ्या घसरणीसह बंद झाल्यामुळे, भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहेत.

जागतिक स्तरावर Geopolitical risk अजूनही जास्त आहे, त्यामुळे मोठे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. विशेषतः Foreign Institutional Investors (FIIs) आणि मोठ्या संस्थांनी सध्या Risk-Off Strategy घेतली आहे (म्हणजे जास्त रिस्क न घेणे) गेल्या आठवड्यात निफ्टी मध्ये (Nifty 50) 728.20 पॉइंट्सची घसरण म्हणजेच सुमारे 2.89% घट झाली तसेच सेन्सेक्स (Sensex ) मध्ये 2,368.29 पॉइंट्सची घसरण म्हणजे 2.91% घट झाली.

ही घसरण बाजाराच्या दृटीने महत्त्वाची आहे: निफ्टीमध्ये 28 फेब्रुवारी 2025 नंतरची हि सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. तसेच सेन्सेक्स साठी साठी ही 20 डिसेंबर 2024 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.

का वाढतोय बाजारावर दबाव?

१. कच्च्या तेलाच्या किमतीत भडका: युद्धामुळे कच्च्या तेलाचा (Brent Crude) पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने प्रति बॅरल भाव 92 डॉलरच्या वर पोहोचले आहेत. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर आतापर्यंत १९% वाढले आहेत.
२. महागाईची भीती: ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमतींमुळे जागतिक महागाई पुन्हा डोकं वर काढू शकते, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या आशा मावळल्या आहेत.
३. रुपयावरील दबाव: डॉलरच्या तुलनेत रुपया ९१.७० च्या नीचांकी पातळीच्या जवळ असल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

हे युद्ध लवकर न संपल्यास जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा भाग या संघर्षातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे:

जगातील सुमारे २०% तेल आणि गॅस पुरवठा याच मार्गातून होतो.
भारत आणि चीनसारख्या देशांसाठी हा मार्ग अत्यंत कळीचा आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल.

युद्ध जास्त काळ चालल्यास कच्च्या तेलाचे दर आणखी भडकतील. काही तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष चिघळल्यास दर $१५० पर्यंत जाऊ शकतात. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतील, ज्यामुळे महागाईत भर पडेल. उद्योगांचे उत्पादन खर्च वाढतील आणि नफ्यावर (Margins) दबाव येईल. सरकारवर आर्थिक नियोजनाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड दिसू शकतो.

पुढील आठवड्यातील घडामोडी बाजारासाठी फार महत्वाच्या ठरणार आहेत. बाजाराचे लक्ष पश्चिम आशियातील युद्धाच्या बातम्या, क्रूड ऑइलचे दर, US Inflation डेटा, India CPI डेटा, FII Buying / Selling तसेच रुपयांची चाल यावर असेल. बाजार “Headline Driven” राहू शकतो.

निफ्टी साठी 23,900 ते 24,850 या रेंजमध्ये ट्रेड होऊ शकतो. Support: 23,900 – 24,000 Resistance: 24,700 – 24,850

लेखक : शेअर बाजार,
सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.

The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.

ईमेल: jiteshsawant33@gmail.com

ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *