तेजल साळवेचे आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश

 तेजल साळवेचे आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश

जालना दि २१:– जालन्याच्या तेजल साळवेने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश संपादित केलंय. 16 ते 20 जून दरम्यान सिंगापूर येथे आशिया कप तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जालन्याची तिरंदाज असलेली तेजल साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तेजलने अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाई हीचा 146 – 144 असा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.

अशिया कप तिरंदाजी स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी तेजल हिने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य, तर दक्षिण कोरिया येथे 2014 मध्ये झालेल्या आशिया कप स्टेज – 3 मध्ये रौप्यपदक पटकावले होते. तसेच गोवा येथे झालेल्या थर्टी सेव्हन नॅशनल गेम्समध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले होते. दरम्यान, सिंगापूर येथे झालेल्या आशिया कप स्टेज दोन तिरंदाजी स्पर्धेत तेजलने सुवर्ण कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, आता 14 ते 24 ऑगस्टदरम्यान कॅनडा येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजल आपले नशीब अजमावणार आहे. 17 वर्षीय तेजलने आतापर्यंत आशियाई युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि विविध एनटीपीसी नॅशनल रँकिंग स्पर्धांमध्ये पदक मिळवून आपल्या खेळाची छाप पाडली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *