राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद आंदोलन

 राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद आंदोलन

ठाणे, दि. ५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आज, मंगळवारी एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले होते. सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ ठाण्यासह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले.

राज्यातील ६०० तहसीलदार आणि २,२०० नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलकानी एक दिवसीय सामुहिक रजा घेतल्याने दाखले वितरणासह अन्य महसुली कामकाज ठप्प झाली होती. मागण्या मान्य न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार आणि नायब तहसिलदार संघटनेने दिला आहे.

‘ग्रेड पे’ची अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांनीही दिले आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार , नायब तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ३ मार्चपासून राज्यभरातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करून राजपत्रित वर्ग २ यांचे ‘ग्रेड पे’ ४,८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. परंतु अपर मुख्य सचिवांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा दावा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे.

तहसीलदार, नायब तहसीलदारांवर वेळोवेळी अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जातात. परंतु पगारवाढीच्या वेळी मात्र चालढकल केली जाते. त्यामुळेच कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. सर्व तहसीलदार , नायब तहसीलदार यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निर्देशने दिली.मागणी माण्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन चा इशारा तहसिलदार युवराज बांगर आणि नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी दिला आहे.

ML/KA/SL

5 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *