तहसिलदाराला 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक…

 तहसिलदाराला 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक…

नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना, नाशिक तालुक्याचे तहसिलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली. सदरची लाच स्वीकारताना तहसिलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली आहे.

राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे, यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले.

याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले, परंतु जमीन मालक वयोवृद्ध आणि आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली, त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली.

सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले आणि मागणी केलेली लाचेची रक्कम आज लाच म्हणून स्वीकारली. त्यामुळे लाचखोर बहिरम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Tehsildar arrested while accepting bribe of 15 lakhs

ML/KA/PGB
6 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *