वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाड, सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद…

जालना दि १२:– वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेश होईपर्यंत कापूस खरेदी बंद असेल असं कळवलं आहे. त्यामुळे, जो पर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट सुरू होत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणू नये असं आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आलं आहे.