पॉलिटिकल थ्रिलर ‘द साबरमती रिपोर्ट’चा टिझर रिलिज

 पॉलिटिकल थ्रिलर ‘द साबरमती रिपोर्ट’चा टिझर रिलिज

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘१२वी फेल’ (12th Fail) चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आता ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा उत्सुकतावर्धक टीझर रिलिज झाला. एकता कपूर निर्मित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात राज्यामध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

एकता कपूर निर्मित ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राशी खन्ना आणि विक्रांत मेस्सी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरमध्ये पहिल्याच फ्रेमपासून विक्रांत आणि राशी पत्रकार म्हणून त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडतात. विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा हे तिघे जण मिळून या घटनेमागचे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाचा टीझर खूपच जबरदस्त आहे. विक्रांत मेस्सीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना.’

SL/ML/SL

28 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *