दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा टिझर रिलिज

 दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा टिझर रिलिज

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतून उत्तमोत्तम ऐतिहासिक चित्रपटांचा नजराणा रसिकांसमोर साकार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता संत मुक्ताईंचे चरित्र मांडणारा चित्रपट घेऊन आले आहेत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा त्यांचा नवीन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची चैतन्यमय झलक पहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत लहानगी ईश्मिता जोशी दिसत आहे.

चित्रपटाच्या संगीताची धुरा अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

SL/ML/SL

21 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *