बुमराहच्या नेतृत्वात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जसप्रीतने सातत्याने त्याच्या जलदगती गोलंदाजांचा वापर करताना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ठेवले. भारताने दमदार कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावरील सर्वात मोठा विजय ठरला. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जसप्रीतने दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजच्या 3 व वॉशिंग्टनच्या 2 विकेट्सने विजयात हातभार लावला.