वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

 वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारताला विंडीजविरुद्द एकूण १० सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने अशा एकूण तीन मालिका खेळायच्या आहेत. १२ जुलैपासून उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु भारतीय संघ त्याच्या एक महिना आधीच कॅरेबियन बेटांवर दाखल होणार आहे. भारताची अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारताचं शेड्यूल व्यस्त नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पहिल्या कसोटीच्या किमान १० दिवस अगोदरच टीम इंडियाला कॅरेबियन बेटांवर पाठवणार आहे. भारतीय क्रिकेटपटू तिथे जाऊन तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संघ १ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला पोहोचेल.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल तर एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी असेल.

भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

भारताचा वन डे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल. कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

SL/KA/SL

23 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *