टिम इंडीया चिंतेत, प्रशिक्षक द्रविडची प्रकृती बिघडली
कोलकाता, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तातडीने कोलकाताहुन बंगळुरूसाठी रवाना झाला आहे. इतर सपोर्ट स्टाफ आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान द्रविडयांनी रक्तदाबाची तक्रार केली होती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. मात्र, आता त्यांची चाचणी बेंगळुरूमध्येच होणार आहे.
यामुळे भारत श्रीलंके दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी द्रविड उपस्थित राहू शकणार नसल्याने भारतीय संघ काळजीत पडला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (15 जानेवारी) होणार आहे. मात्र, त्या आधीच संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची तब्येत बिघडली आहे.
द्रविडच्या तब्येतीबाबत काळजी करण्यासारखं काही नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच रविवारच्या सामन्यपूर्वी द्रविड संघासोबत तिरुअनंतपुरममध्ये सामील होईल असे सांगितले जात आहे.