टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिला टीम इंडिया आणि महिला ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुरुवातीच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडे येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, टीम इंडिया नाणेफेकमध्ये विजयी झाली आणि 50 षटकात 282-8 धावा करण्यात यशस्वी झाला. मात्र, महिला ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा प्रभावीपणे पाठलाग करत 47व्या षटकात विजय मिळवला. फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी अर्धशतकांसह योगदान दिले आणि त्यांच्या विजयासाठी आधार तयार केला. परिणामी ऑस्ट्रेलियाने आता तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाकडून सलामीला आलेली शफाली वर्मा परत एकदा अपयशी ठरली. यास्तिका भाटिया 49 धावा, जेमिमाफ रॉड्रिग्स 87 धावा आणि ऑल राऊंडर पूजा वस्त्राकर हिने आक्रमक खेळ अर्धशतकी खेळी केली. जेमिमाहने 77 चेंडूत 82 धावांची खेळी केली, यामध्ये तिने सात चौकार मारले. तर पूजाने अवघ्या 46 चेंडूत 62 धावा केल्या, यामध्ये तिने सात चौकार आणि दोन षटकार मारले. हरमनप्रीत कौर, रिचा घोष, अमनज्योत कौर यांना मोठी खेळी करता आली नाही. पूजा वस्त्राकर हिने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तीनशेच्या आसपासचा टप्पा गाठला.
टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचीही सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला रेणूका ठाकूर हिने अॅलिसा हिलीला शून्यावर माघारी पाठवलं होतं. या विकेटनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. फोबी लिचफील्ड आणि एलिस पेरी यांनी 148 धावांची भागीदारी केली होती. स्नेह राणा हिने एलिस पेरीला 75 धावांवर आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर काही ओव्हरच्या अंतराने दीप्ती शर्मा हिने लिचफील्ड हिला 78 धालांवर माघारी पाठवलं.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (W), रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (C/W), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउनाTeam India lost to Australia
ML/KA/PGB
29 Dec 2023