टि सी एस कर्मचारी कपाती विरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज व्यवहारे यांचे ठिय्या आंदोलन

मुंबई, दि १८- “टि सी एस कर्मचारी कपातीमुळे एकूणच आय टी कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी टिसीएस कर्मचारी कपाती विरोधात राज्यातील कार्यकर्त्यांसोबत ठीक ठिकाणी जोरदार ठिय्या आंदोलन केले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले टीसीएस कंपनीने कामगार कपातीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची कृती करावी.
27 जुलै ला टि सी एस ने कर्मचारी कपातीचा निर्णय केल्यावर सोमवारी 28 जुलै रोजी शेअर बाजारात टिसीएस च्या शेअर मध्ये मोठी पडझड झाली. यादरम्यान इन्सायडर ट्रेडिंगचा संशय मनोज व्यवहारे यांनी व्यक्त केला असून LIC ने विमाधारकांचे आणि सामान्य भागधारकांचे आणि गुंतवणूदारांचे मोठेनुकसान झाले असून पैसे यात आपली ट्रेडिंग झाली आहे का याची सेबीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे.”
महत्वाचे म्हणजे ‘हा फक्त 12000 कर्मचाऱ्यांचा विषय नसून हा 12000 कुटुंबांचा विषय आहे. आणि आज हे कामगार कपातीचे काम टीसिएस करत आहे उद्या. उद्या दुसऱ्या कंपन्यांचे कर्मचारी आणि त्यांची कुटुंब असू शकेल, त्यामुळे कृत्रीम बुद्धिमता आणि कामगार कपात हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज मनोज व्यवहारे यांनी व्यक्त केली.
रतन टाटा यांनी टाटा मोटर्स साठी स्वतःची फिक्स्ड डिपॉझिट तोडून कंपनी वाचवली. 26/11 च्या हल्ल्यानंन्तर ताज हॉटेल मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतली. आज रतन टाटा ह्यात नाहीत तर TCS ही मूल्ये विसरत चालली आहे. आज टीसीएस मध्ये कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा घेतले जात आहेत. अशी खंत यावेळी मनोज व्यवहारे यांनी व्यक्त केली. औद्योगिक विवाद अधिनियम 1947 च्या कलम 25N च्या अंतर्गत ही बाब येत असून टीसीएस कायद्याचे उल्लंघन करत आहे, त्यामुळे जोपर्यंत ही कपात मागे घेतली जात नाही तोपर्यत मनोज व्यवहारे आणि त्यांचे पदाधिकारी आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्राची प्रदेश. कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.KK/ML/MS