महिलांनो ! प्रवासात तिकीट नसल्यास तुम्हाला टिसी नाही काढू शकत ट्रेनच्या बाहेर
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एखादी महिला तिकिट नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर टीटीई तिला खाली उतरण्यास सांगू शकत नाही.
भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो.
भारतीय रेल्वे कायदा 1989 चे कलम 139 महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो.
भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार, जर एकट्याने प्रवास करत असलेली महिला
तसेच लहान मूल घेऊन रात्रीच्या वेळी तिकिटाविना महिला ट्रेनमधून प्रवास करत असेल,
तर TTE त्यांना या नियमानुसार खाली उतरवू शकत नाही.
मध्यरात्री टीटीईने एखाद्या महिलेला ट्रेनमधून उतरवल्यास,
ती महिला संबंधित महिला रेल्वे अधिकाऱ्याकडे टीटीईविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते.
महिलेला कोणत्याही ठिकाणी उतरवू शकत नाही, तर…
जर महिलेकडे तिकीट नसेल आणि प्रवास करत असेल तर TTE त्या महिलेला कोणत्याही ठिकाणी उतरवू शकत नाही. ज्या भागात ट्रेन धावत आहे, त्या ठिकाणच्या जिल्हा मुख्यालयाच्या स्थानकावरच टीटीईला सोडता येईल. जिल्हा मुख्यालयाच्या रेल्वे स्थानकावर महिलेला उतरवण्यापूर्वी टीटीईने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर महिलेला त्या स्थानकावरून दुसरी ट्रेन पकडता येते
PGB/ML/PGB
27 Aug 2024