करदात्यांनी केला आयटीआर भरण्याचा विक्रम

 करदात्यांनी केला आयटीआर भरण्याचा विक्रम

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करदात्यांनी वेळेत प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरावे यासाठी प्राप्तीकर विभागाकडून सोशल मिडियावर आवाहन मोहिम आयोजित करण्यात आली होती. या प्रयत्नांना आता चांगले यश आले असून प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यात वाढ झाल्याने आणि परिणामी आयटीआर सादरीकरणाचा नवा विक्रम झाल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने वेळेत अनुपालन करणाऱ्या करदाते आणि कर व्यावसायिकांचे कौतुक केले आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 31 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या आयटीआर ची एकूण संख्या 6.77 कोटी पेक्षा जास्त आहे, जी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेल्या मूल्यांकन वर्ष 2022-23 (5.83 कोटी) च्या एकूण आयटीआर पेक्षा 16.1% जास्त आहे.

31 जुलै, 2023 रोजी (पगारदार करदात्यांची आणि इतर विना-कर लेखापरीक्षण प्रकरणात देय तारीख) आयटीआर भरण्याचे प्रमाण एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 64.33 लाखांहून अधिक होते. ई-फायलिंग पोर्टलने 31 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5 PM ते 6 PM दरम्यान आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति तास दर 4,96,559, आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति सेकंद दर 486 (31-जुलै-2023: 16:35:06) आणि आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति मिनिट 8,622 (31-जुलै-2023: 17:54) नोंदवला.विभागाला 31 जुलै 2023 पर्यंत प्रथमच फाइल करणाऱ्यांकडून 53.67 लाख आयटीआर देखील प्राप्त झाले आहेत. ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन कर भरण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी 46 टक्क्यांहून अधिक रिटर्न ई-फायलिंग पोर्टलद्वारे ऑनलाइन जमा झाले आहेत, तर उर्वरित रिटर्न ऑफलाइन भरले गेले.

आयकर विभागाने पगारदार करदात्यांना आयटीआर जमा करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. याशिवाय ज्या करदात्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नाच्या लेखापरीक्षणाची गरज नाही ते देखील या तारखेपर्यंत त्यांचे विवरणपत्र सादर करू शकतात. परंतू ज्या कंपन्या आणि व्यक्तींना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. करदात्यांना रिटर्न भरताना आणि इतर मदतीसाठी येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आयकर विभागाने एक ई-फायलिंग डेस्कही स्थापन केला होता.

SL/KA/SL

2 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *