महिलांसाठी टॅक्सी प्रशिक्षण शिबिराचा झाला शुभारंभ

 महिलांसाठी टॅक्सी प्रशिक्षण शिबिराचा झाला शुभारंभ

मुंबई, दि ८
शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्त्री शक्ती केंद्र आणि प्रियदर्शिनी टॅक्सी सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी ड्रायव्हिंग स्कूलच्या पहिल्या महिला बॅचचे प्रशिक्षण शुभारंभ प्रियदर्शनी पार्क येथे करण्यात आला. या शिबिरामध्ये महिला चालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिराच्या माध्यमातून महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण उपलब्ध होणार असून महिला स्वावलंबी होणार आहे. या आधी देखील आमच्या 1000 पेक्षा जास्त महिलांनी ड्राइविंग प्रशिक्षण शिबिर शिकून स्वतःच्या पायावरती उभे राहून त्या टॅक्सी चालवत आहेत.या उपक्रमातून सहभागी सर्व महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी दिली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *