पगारदारांच्या संख्येत गेल्यावर्षी झाली घट

 पगारदारांच्या संख्येत गेल्यावर्षी झाली घट

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेबद्दल (Economy) चिंता निर्माण करणारे वृत्त आले आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 50 लाखाहून अधिक वार्षिक कमाई करणार्‍या पगारदार लोकांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना संकटाने अर्थव्यवस्थेवर वर्चस्वदेखील मिळवले नव्हते तेव्हाची ही बाब आहे. प्राप्तिकर विवरण भरणा (Income Tax Ruturn) आकडेवारीवरुन ही माहिती उपलब्ध झाली आहे.
अहवालानुसार, पगार, घर मालमत्ता किंवा शेतीमधून 5000 रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळवणार्‍यांसाठी आर्थिक वर्ष 2020 मध्ये आयटीआर -1 अर्जा अंतर्गत प्राप्तिकर विवरण (Income Tax Ruturn) भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 होती. जानेवारी अखेरच्या आकडेवारीनुसार या वर्गातील करदात्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 6.6 टक्क्यांची घट झाली आहे. कर देणार्‍यांमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याने ही चिंतेची बाब आहे. या वर्गवारीत प्राप्तिकर विवरण भरण्यात घट झाल्याने संपूर्ण विवरण भरणा देखील 6.5 टक्क्यांनी कमी झाला आहे. यात वैयक्तिक करदात्यासह कंपन्यांचाही समावेश आहे, परंतु कंपन्यांच्या बाबतीत ही आकडेवारी पूर्ण नाही. ज्या कंपन्यांचे लेखापरिक्षण करणे आवश्यक होते त्यांच्यासाठी कर भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आली होती, म्हणून या आकडेवारीमध्ये ज्यांनी शेवटच्या क्षणी कर भरला असेल अशा कंपन्यांचा समावेश नाही .

कर वसुलीचा आधार कमी होत आहे

कर विवरण भरणार्‍यांची (Income Tax Ruturn) वेगवेगळी वर्गवारी असते. दरवर्षी नवीन करदाते कर विवरण भरणा प्रक्रियेत सामील होतात. त्याच वेळी, काही लोक नोकरी गमावल्यामुळे किंवा मृत्यूमुळे या यादीमधून बाहेर पडतात. कर विवरण भरणार्‍या लोकांच्या संख्येतील घट स्पष्टपणे कर संकलन कमी होत असल्याचे दर्शवते. जीडीपीमध्ये सुमारे 4 टक्के वाढ होत असल्याचे दिसत असतानाच कर विवरण भरणार्‍या लोकांच्या संख्येत घट होणे ही चिंतेची बाब आहे.

घट होण्याची अनेक कारणे

ऑनलाईन कर सेवा देणारी कंपनी क्लियर टॅक्सचे संस्थापक अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, या घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात. कर विवरण भरण्याच्या शेवटच्या तारखेसंदर्भात संभ्रम होता. तसेच काही जणांना कर विवरण दाखल करण्याची मूदत वाढवली जाईल अशी अपेक्षा वाटत होती. अनेक व्यवसाय बंद पडल्यामुळे त्यांच्या कर्मचार्‍यांना फॉर्म -16 मिळालेले नाहीत, कर विवरण न भरण्यामागे हे देखील महत्त्वाचे कारण असू शकते.

2021-22 पासून कोरोनाच्या परिणामाचा अंदाज येईल

ईवाय चे कर भागीदार सोनू अय्यर यांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणू संकटाच्या काळात लोकांच्या कमाईवर काय परिणाम झाला याचा खरा अंदाज 2021-22 च्या कर विवरणावरुन येऊ शकेल. मात्र जास्त कमाईच्या श्रेणीत कर विवरण भरणार्‍या लोकांच्या संख्येत घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. कर सल्लागार कंपनी डीव्हीएसचे संस्थापक दिवाकर विजयसारथी म्हणाले की कोरोना विषाणूमुळे कर भरण्यात घट होऊ शकते. परंतू अंतिम आकडेवारी या वर्षाच्या अखेरीलाच मिळु शकते. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. थेट करांचा आधार वाढवणे याला सरकारचे प्राधान्य राहिले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेली नोटाबंदी आणि 2017 मध्ये जीएसटी रोलआऊट नंतर आयकर विवरणपत्र भरण्यात मोठी तेजी आल्याचे दिसले होते परंतु नंतर ती सुस्तावली.
PL/KA/PL/5 MAR 2021
 

mmc

Related post