टाटा रुग्णालय येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २२
परळ येथील टाटा या कर्करोग रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. 500 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रुग्णास त्वरित रक्त मिळावे या हेतूने आम्ही शिवरायांचे आयोजन केले असून यापुढे देखील आम्ही विविध सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती टाटा रुग्णालयातील डॉक्टर टीमने दिली. रक्तदान हे श्रेष्ठदान असून यासारखे पुण्य दुसरे कोणतेही नाही. गरज पडते तेव्हा रक्ताचा तुटवडा भासतो असे आपण अनेक वेळा ऐकला आहे परंतु आपण आमच्याकडे कधीही आला तरी आम्ही आपणास रक्तदात्याचे कार्ड उपलब्ध करून देतो अशी माहिती नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी दिली. याप्रसंगी रक्तदात्यांचे जाधव यांनी आभार व्यक्त करून आपल्या कार्याला शुभेच्छा दिल्या.KK/ML/MS