गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईला
उधाण

 गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईलाउधाण

मुंबई, दि १८
शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्या आणि लगेचंच गुढी पाडवा आल्याने बाजारात वेगळीच लगबग आहे. कुठले कपडे परिधान करायाचे . सदरा आणि कुरता कुठल्या रंगाचा घ्यायचा इथपासून ते नउवारी साडी नेसायची कि पंजाबी ड्रेस घालायचा यामध्ये तरुणाई अत्यंत बुडाली आहे. तर गृहिणीनि घरी कुठला गोड पदार्थ करायचा तर नवीन काही दागिने करायचे का? या गोष्टींची चर्चा एकंदरीत सर्वच कुटुंबामध्ये पाहायला मिळत आहे.
साडे तीन मुहूर्तापैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा यादिवशी मराठी नववर्षाची सुरुवात तसेच नव्या संकल्पांची सुरुवात होत असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच नववर्षाच्या सुरुवातीसाठी संपूर्ण कुटुंब तयारीला लागला आहे. काही शनिवार आणि रविवार सुट्टीचा मुहूर्त बघून महिलांनी घराची साफसफाई केलि. तर काही मंडळीनी घराला नवीन रंगकाम करून गुढीपाडवा अत्यंत उत्साहाने साजरा करण्याचे ठरवले आहे. तर तरुणाइने दुचाकीच्या माद्यमातून शोभा यात्रा काढण्यावर विशेष भर दिला आहे. या शोभा यात्रेमध्ये पारंपारिक पद्धतीचे कपडे सदरा , कुर्ता, शेरवानी, पठाणी, नौवारी साडी, काष्टी साडी यासारख्या विविध नवीन कपडे खरेदी करण्यासाठी लालबाग, दादर, भायखळा, भुलेश्वर, हिरा पन्ना या ठिकाणी तरुणाइची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
मुलीनी रेडीमेड साड्यांना विशेष पसंती दिली असून या साड्यांची किमत 500 ते 5000 रुपयापर्यंत आहे. पैठणी, कांजीवरम, बंगाली आणि सिल्क साड्यांना बाजारात फार मागणी आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *