टेरिफ वॉर अधिकच उग्र, ट्रम्प यांनी चीनवर लादला 245 % कर

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या टेरिफ वाढीने आता उग्र रुप धारण केले आहे. दोन्ही देश दिवसागणित परस्परांवर अधिकाधीक कर लावण्याची चढाओढ करत आहेत. अमेरिकेने आता चीनवर आणखी १००% कर लादला आहे. यासह, चिनी वस्तूंवरील एकूण शुल्क २४५% पर्यंत वाढले आहे. चीनने ११ एप्रिल रोजी अमेरिकन वस्तूंवर १२५% कर लादला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनी नवीन कर लादला आहे. यापूर्वी बीनने म्हटले होते की आता ते अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला प्रतिसाद देणार नाही.
अमेरिकेसोबतच्या वाढत्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच व्यका झाले आहेत. ते म्हणाले की, चीन कोणालाही घाबरत नाही. गेल्या ७० वर्षात चीनचा विकास हा कठोर परिश्रम आणि स्वावलंबनाचा परिणाम आहे. जिनपिंग म्हणाले- चीन कधीही इतरांच्या दानधर्मावर अवलंबून राहिलेले नाही. किंवा कधीही कोणाच्या बळाला घाबरले नाही. जग कितीही बदलले तरी चीनला काळजी वाटणार नाही.
SL/ML/SL/
17 April 2025