तानसा धरण वाहू लागले

ठाणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण भरून वाहणे (ओव्हर फ्लो) सुरू झाले आहे. तानसा धरण ओसंडून वाहत आहे. आता धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून 7700 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. Tansa Dam began to flow
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
ML/KA/PGB
26 July 2023