महिलांनी नर्सिंगचे शिक्षण घेण्यावर तालिबानकडून बंदी

 महिलांनी नर्सिंगचे शिक्षण घेण्यावर तालिबानकडून बंदी

काबूल, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणावर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, काबूलमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली, ज्यामध्ये तालिबान सरकारचा निर्णय जाहीर करण्यात आला.अफगाणिस्तानमधील आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु बैठकीदरम्यानच त्यांना सांगण्यात आले की महिला आणि मुली यापुढे या संस्थांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत. यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही.

ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, अफगाणिस्तानात सर्वाधिक महिलांचा मृत्यू मुलांना जन्म देताना होतो. देशात आधीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तालिबानच्या या निर्णयाचा देशावर विनाशकारी परिणाम होणार आहे. ऍम्नेस्टीने म्हटले आहे की, – अफगाणिस्तानमध्ये माता मृत्यू दर सर्वाधिक आहे, तो आणखी वाढेल अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र मिशननेही तालिबान सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचा देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि विकासावर नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मिशनने म्हटले आहे.

क्रिकेटर रशीद खानने तालिबानच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, तालिबानच्या या निर्णयाचा अफगाणिस्तानवर खोल परिणाम होईल, कारण देशात आधीच वैद्यकीय आणि पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे.

रशीदने पुढे लिहिले-
“इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे, जे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आवश्यक मानले जाते. अफगाणिस्तानमधील महिलांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था बंद केल्याने मला खूप दुःख झाले आहे.”

“अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला की, मुलींना वैद्यकीय शिक्षणापासून बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही. इस्लामने नेहमीच सर्वांसाठी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.”

SL/ML/SL

5 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *