मराठा आरक्षण आंदोलनामुळे एस टी चे सव्वा पाच कोटींचे नुकसान

 मराठा आरक्षण आंदोलनामुळे एस टी चे सव्वा पाच कोटींचे नुकसान

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर ,परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बसेस पूर्णता जळालेल्या आहेत तसेच १९ बसेस ची मोडतोड झाली आहे. यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखाचे नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसात बंद असलेल्या आगारामुळे आणि इतर आगारातील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे ८ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे.
आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एसटीच्या एकूण बस फेऱ्या पैकी सुमारे ६२०० फेऱ्या बंद मुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सुमारे २ कोटी ६० लाख रुपये महसूल बुडाला आहे.

ML/KA/SL

4 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *