विशाल ढुमे यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा…
पुणे दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी अश्लील वर्तन केले ,यासंदर्भात त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
रात्री महिलांना पोलीस ठाण्यात बोलविण्यापेक्षा महिला पोलीस अधिकार्रांयांनी साध्या वेशात पिडीतांच्या धरून जबाब घेणे आवश्यक होते, असे झालेले नाही. याबाबत पोलीस आयुक्त यांनी व्यक्तिशः लक्ष घालणे आवश्यक होते परंतू असे होताना दिसले नाही. अशा परिस्थितीनंतर यासंदर्भात सिटीचौक, संभाजीनगर (औरंगाबाद) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानंतर ढुमे यांचे निलंबन शासनाने केले. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नसून ढुमे हे सध्या संभाजीनगर येथेच आहेत. त्यामुळे त्यांना हेडक्वार्टर सोडून दुसरीकडे पाठविण्यात यावे अशी मागणी डॉ गोऱ्हे यांनी केली आहे. या घटनेत ढुमे हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे ढुमे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे डॉ.गोऱ्हे आज फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ML/KA/SL
21 Jan. 2023