अयोध्येत लवकरच सुरू होणार ताज हॉटेल
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी २०२४ मध्ये हे मंदीर पूर्ण होणार आहे. या निमित्ताने आता या मंदिराला भेट देण्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटक अयोध्येला भेट देतील. त्यांच्या व्यवस्थेसाठी टाटाच्या ताज ग्रुपने अयोध्येमध्ये पंचतारांकीत ताज हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे.
मोदी आणि योगी सरकारकडून अयोध्येला जागतिक दर्जाचे पर्यंटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अयोध्येला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे कामही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टाटा ताज ग्रुप अयोध्येत ३ पंचतारांकीत हॉटेल्स उभारणार आहे. २०२७ पर्यंत या हॉटेल्सची उभारणी पूर्ण होईल. विवांता आणि जिंजर ही टाटा ताज ग्रुपकडून उभारण्यात येणारी हॉटेल्स अयोध्येतील पहिली ब्रँडेड हॉटेल्स असतील.
यामुळे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यंटन केंद्र म्हणून विकसित होणाऱ्या अयोध्येत रोजगाराच्या संधी विकसित होतील आणि पर्यायाने उत्तर प्रदेशच्या विकासाला गती येईल.
SL/KA/SL
22 April 2023