मोदी-ट्रम्प भेटीत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

 मोदी-ट्रम्प भेटीत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा संपला असून ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *