सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती ताडोबाला , 30 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग फुल
चंद्रपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या सुट्यात जंगल सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह इतर अभयारण्याच्या बुकिंगची स्थिती हेच दर्शवित आहे. बहुतेक अभयारण्यात सफारीचे बुकिंग संपूर्ण नोव्हेंबर महिना फुल्ल आहे. एवढेच नाही. तर नाताळच्या सुट्यापर्यंतचे बुकिंग आताच करण्यात आले आहे.
ताडोबातील सफारी केवळ दिवाळीतच फुल्ल आहे. असे नाही तर पर्यटकांनी नाताळपर्यंतचे बुकिंगही आताच केले आहे. 3० नोव्हेंबरपर्यंत बुकिंग १०० टक्के फुल्ल आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत ७ हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. कोअर झोनचे ६ आणि बफर झोनचे १९ प्रवेशद्वारावरील बुकिंग पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यानंतर या सफारी सुरू होताच लोकांनी सुट्यांचे बुकिंग केले आहे. Tadobala is a tourist favorite during holidays, bookings are full till 30th November
ML/KA/PGB
17 Nov 2023