ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रातील पर्यटन १ जुलैपासून बंद….

 ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रातील पर्यटन १ जुलैपासून बंद….

चंद्रपूर दि ३० :—
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर (गाभा) क्षेत्रातील पर्यटन आता १ जुलैपासून पावसाळ्यामुळे बंद होणार आहे. या कालावधीत जंगल सफारीवर निर्बंध असून, पर्यटकांना व्याघ्रदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सफारी सुरू राहणार आहे.

पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी बफर क्षेत्रात मिळेल. कोअर क्षेत्रातील सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल, तोपर्यंत बफर क्षेत्रातील सफारीचा आनंद घेता येईल. पावसाळ्यात वाहनांच्या अडचणी , वन्यप्राण्यांच्या प्रजनन काळात आणि प्राण्यांच्या हालचाली अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *