T 20 विश्व विजेता इंग्लिश संघ

 T 20 विश्व विजेता इंग्लिश संघ

मेलबोर्न, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  T 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लिश संघाने पाकिस्तान वर पाच गडी राखून मात करीत ही स्पर्धा जिंकली.T20 World Champions English Federation

आज झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा संघ वीस षटकात केवळ 137 धावा करू शकला , इंग्लंड संघातील Sam करन, मोईन आली आणि जॉर्डन या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करीत पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले.

इंग्लंडच्या डावाची सुरुवात ही खराबच झाली पहिल्याच षटकात अलेक्स हेल्स पहिल्याच षटकात बाद झाला, भारताविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या बटलर लाही लवकर बाद करण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यश आले, त्यानंतर अत्यंत अचूक आणि टिच्चून गोलंदाजी करीत त्यांनी इंग्लिश फलंदाजांना जखडून ठेवले आणि एका वेळी सामना आपल्या बाजूने फिरवला होता.T20 World Champions English Federation

मात्र एका बाजूने टिकून राहत संयमी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्स ने एकहाती सामना फिरवला , त्याने मोईन अली सोबत भागीदारी करत विजयश्री खेचून आणली, एक षटक आणि पाच गडी राखत शेवटी इंग्लंड संघ विश्व विजेता ठरला.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *