T-20 शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा रोड शो
नागपूर दि ९ : भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं उमरेड – पवनी – कऱ्हांडला हे अभयारण्य पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनाचं विशेष मेजवानी ठरत आहेत. या अभयारण्यात T-20 शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरतं आहे. ही वाघीण तिच्या तीन बछड्यांसह भंडाऱ्याच्या पवनी गेट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पवनी ते खापरी मार्गावर मुक्तसंचार करताना बघायला मिळाली. या मुक्तसंचारादरम्यान शॅडो वाघीण आणि तिच्या बछड्यांचं रुबाबदार आणि डौलानं चालण्याचा हा रोड शो या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनधारकानं त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे , सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.ML/ML/MS