“स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार धोरण” या विषयावर परिसंवाद
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वा., कक्ष क्रमांक १४५, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे “स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार तसेच हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित राहणार असून मेक्सिको, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँडस्, जपान, रशिया, फ्रान्स या देशांचे मुंबईतील महावाणिज्यदूत देखील परिसंवादात सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रम निमंत्रित व्यक्तींसाठी आहे.
ML/KA/SL
14 Sept. 2023