मालेगाव शहरात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, एक मृत्यू…
नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगाव शहरात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झाला असून त्यात एका माजी कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालेगाव महानगर पालिकेचे आरोग्य विभाग अलर्ट झाले असून त्या मृत्यू झालेल्यांच्या घरातील व्यक्ती, परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्र येथे जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन मालेगाव मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी केले आहे.
ML/ML/SL
28 April 2024