अकराव्या वर्षी जलतरणपटू मयंक म्हात्रेने केला विक्रम
उरण, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील उरणचा अकरा वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ किमीचे सागरी अंतर ५ तास २९ मिनिटांत पूर्ण करून रायगड जिल्ह्यातील उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी 18 किमीचं अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. मयंकने ३ डिसेंबर २०२३ ला धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता. ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला आहे. त्याने या निमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तामध्ये शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जळतरणपटू आहे. समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. मयंकने आजवर अनेक स्पर्धांमधून यश संपदान केले आहे. मात्र समुद्रीय जलतरण हे त्याला मोठे यश आणि प्रसिद्धी देणारे ठरले आहे.
समुद्र किनारी लागून असणाऱ्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणाऱ्या या 11 वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. मंगळवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:०४ मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी १८ किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धातास आधी पोहून पूर्ण केले आहे. हा प्रवाह पोहून जाण्यासाठी ६ तासांचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर ५ तास २९ मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकीत केले आहे. त्याने केलेल्या या प्रयत्नाने घारापुरी ते करंजा हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे.