Swiggy, Zomato पावसाळ्यात लागू करणार दरवाढ

मुंबई, दि. १६ : पावसाळ्यात ग्राहकांना फूड डिलिव्हरीवर वाढीव अधिभाराचा फटका सहन करावा लागणार आहे. झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या दोन्ही प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर दिलेल्या प्रीमियम सबस्क्रिप्शन सर्व्हीसमध्ये नोंदणी केलेल्यांना हवामानाशी संबंधित वाढीदरम्यान अतिरिक्त शुल्क भरण्यापासून सूट दिली होती.आता हा लाभ बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन दिलेली ऑफर मागे घेण्यात आली होती. ती आता मागे घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या दोन सेवाचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजरना पावसात डिलिव्हरी करायचे सेपरेट चार्जेस भरावे लागणार आहेत.
नवीन धोरण बदलामुळे पावसासारख्या प्रतिकूल हवामानात डिलिव्हरी ऑपरेशन्सवर परिणाम झाल्यास झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या सेवांच्या सदस्यांसारखेच आता गैर-सदस्यांकडून डिलिव्हरी अधिभार आकारले जातील. या अपडेटमुळे प्रीमीयम सेवांचा आनंद घेण्यासाठी जादा शुल्क भरणाऱ्या ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, परंतु आता त्यांना आता पावसाळ्यात हे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.