Sarvam AI सह भागीदारी करून Swiggy ने सुरू केले भारतीय भाषांमध्ये ऑर्डरदेणारे फिचर
मुंबई, दि. २५ : Swiggy ने आज Sarvam सोबत एका धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. याअंतर्गत व्हॉइस ऑर्डरिंगची सुविधा सुरू केली जाईल, ज्याद्वारे वापरकर्ते Sarvam च्या ‘Indus’ नावाच्या AI असिस्टंटच्या माध्यमातून अनेक भारतीय भाषांमध्ये जेवण आणि किराणा सामानाची ऑर्डर देऊ शकतील तसेच बाहेर जेवण्यासाठी टेबल बुक करू शकतील.
Sarvam च्या व्हॉइस मॉडेल्ससोबत स्विगी, इन्स्टामार्ट आणि डाइनआउटच्या एकत्रीकरणामुळे, तसेच रेझरपेच्या समावेशामुळे, वस्तू शोधणे, ऑर्डर देणे आणि चेकआउट या सर्व प्रक्रिया संपूर्णपणे हाताळल्या जातील. Sarvam च्या व्हॉइस मॉडेल्सना विस्तृत भारतीय भाषांच्या डेटावर प्रशिक्षित केले आहे, जेणेकरून ते हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मराठीसह ११ भाषांमध्ये व्हॉइस इंटरॅक्शन देऊ शकतील.
SL/ML/SL