स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
स्वीट कॉर्न (कणसे उकडून दाणे काढून)
लाल कांदा १ लहान बारीक कापून
स्वीट पेपर्स (लहान विविधरंगी ढोबळ्या मिरच्या) २ – ३ बारीक कापून
कोथिंबीर बारीक चिरून
हिरवी मिरची जितके तिखट हवे आहे त्या प्रमाणात बारीक चिरून
लिंबाचा रस (शक्यतो ताजा)
मीठ
चाट मसाला
कणसं उकडून घेऊन त्यातले दाणे काढून घेतले. कांदा, मिरची, पेपर्स, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले.
सगळे जिन्नस एकत्र करून त्यात मिठ आणि चाट मसाला घातला.
वरतून लिंबाचा रस पिळून मस्त एकत्र करून घेतले.
मसालेदार जेवण असेल तर कोशिंबीर / सॅलड म्हणून उपयुक्त डीश आहे.
PGB/ML/PGB
29 Aug 2024