विधान परिषदेत अपशब्द , गदारोळ , कामकाज बंद

 विधान परिषदेत अपशब्द , गदारोळ , कामकाज बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत सत्तारूढ सदस्यांनी विधान परिषद सभागृहात निषेध नोंदविण्याची मागणी केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून अपशब्द वापरले गेल्याचा आरोप होऊन प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आधी भाजपाचे प्रसाद लाड यांनी विधानपरिषद सभागृहात निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली, यामुळे सभागृहाचं कामकाज आधी पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारूढ सदस्यांना उद्देशून अपशब्द वापरले असा आरोप झाला.

यानंतर राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव उपसभापतींनी स्वतःहून मांडावा आणि सभागृहानं निषेधाचा एकमतानं ठराव करावा अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी घेतली, यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली. याच दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी अपशब्द वापरले असा आरोप करत सताधारी आक्रमक झाले त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. Swear words, commotion, suspension of work in Legislative Council

ML/ML/PGB
1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *