स्वस्त वीज मिळवणे राज्याला बंधनकारक….

मुंबई दि ८ — राज्यातील वीजपुरवठा तासागणिक स्वस्त दराने घेण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली , तसे बंधन घालण्यात आलं आहे, त्यामुळं औष्णिक वीज उत्पादन महाग पडते , म्हणून नवीन औष्णिक वीज संच उभारणे शक्य नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.
परळी येथे औष्णिक वीज संच उभारणे कामी संपादित करण्यात आलेल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल असं ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ML/ML/MS