बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबन

 बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबन

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत नकारात्मक कारणांसाठी माध्यमांसमोर येत आहे. पुण्यातील गाजलेल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे उघडकीस आल्यानंतर ससूनमधील संबंधित डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता ससूनमधील डॉक्टरांनी केलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे.याबाबत आत्ता ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील 32 वर्षाचा रुग्ण हा 16 जून रोजी ससून रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होते. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला. पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडल्याचे समोर आलं आहे. जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा या प्रकरणात ससून रुग्णालयातील आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी सांगितल आहे.

SL/ML/SL

23 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *