शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांना स्थगिती
मुंबई, दि. 16 : एरव्ही महिनोमहिने फाईल्स धुळखात ठेवणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अगदी ताबडतोबीने ७५ फाईल्स तत्काळ हातावेगळ्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय दुखवटा जाहीर झाल्याच्या काळात अल्पसंख्याक खात्याशी संबंधित राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना फायलींवर सह्या करून अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रकिया स्थगिती होती.
या प्रकरणाची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली. संबंधित 75 शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक दर्जाच्या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहिले प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे.
महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यानंतरही साडे सहा, सात वाजताही फायलींवर सह्या झाल्या आहेत. ‘पोदार’च्या २५ शाळांना २९ जानेवारी या एकाच दिवशी २५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे हे विशेष. स्वामी शांती प्रकाश आणि देव प्रकाशच्या चार शाळांना देखील लाभ देण्यात आला आहे. सेवादास महाराज शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आले. एकंदर अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच सात शाळांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
SL/ML/SL