पॅरिस पॅरालिम्पिक आधी या भारतीय खेळाडूवर निलंबनाची कारवाई

 पॅरिस पॅरालिम्पिक आधी या भारतीय खेळाडूवर निलंबनाची कारवाई

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. अनेक क्रीडाप्रकारामध्ये पदक अगदी थोडक्यात हुकले. काही खेळाडूंना नियमबाह्यही ठरवण्यात आले. त्यानंतर आता २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्ध्यांच्या तोंडावर भारतासाठी एक धक्कादायक बातमी आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता शटलर प्रमोद भगतवर पॅरिस पॅरालम्पिकआधी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. बॅडमिंटन जागतिक महासंघाने मंगळवारी सांगितलं की, पॅरा शटलर प्रमोद भगतला डोपिंग प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्यानं निलंबित करण्यात आलंय. त्याच्यावर १८ महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने सांगितलं की, भारताचा टोकियो पॅरालंम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगतला १८ महिन्यांसाठी निलंबित केलंय. तो पॅरिस २०२४ पॅराऑलिम्पिकमध्येही भाग घेऊ शकणार नाही. भगतने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या एसएल३ क्लासमध्ये भाग घेतला होता. त्यात त्याने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला हरवून सुवर्णपदक पटकावलं होतं. आता पॅरा ऑलिम्पिकला सुरुवात होण्याआधी भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

प्रमोद भगतने गेल्या १२ महिन्यात तीन वेळा त्याचा पत्ता सांगितला नव्हता. त्यामुळे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंग प्रतिबंधक नियम व्हेअरअबाऊटच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. आता या प्रकरणीच त्याला निलंबीत करण्यात आलंय. प्रमोद भगतने कोर्ट ऑफ आर्बिट्रेनशन ऑफ स्पोर्टच्या निर्णयाला आव्हानही दिलं होतं. मात्र २९ जुलै रोजी प्रमोदचं अपिल फेटाळून लावण्यात आलं. कोर्टाने दिलेला १ मार्च २०२४ चा निर्णय कायम ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली.

SL/ML/SL

13 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *