आमदार शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांची महिला आयोगात धाव

 आमदार शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांची महिला आयोगात धाव

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

गेल्या रविवारी म्हणजे २६ तारखेला छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते असा आरोप आहे.

त्याबाबतीत सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला असून शिरसाठ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ML/KA/SL

28 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *