स्वच्छ हवेमध्येही देशात ठरले अव्वल, सुरत

 स्वच्छ हवेमध्येही देशात ठरले अव्वल, सुरत

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात स्वच्छ शहरापैकी एक असणाऱ्या  सुरतने  पुन्हा एकदा आपला लौकिक वाढवला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ मध्ये सुरतने देशभरातील तब्बवल  131 शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत महानगरपालिकेने व्यापक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि सुरतवासीयांच्या सहकार्यामुळे शहराला अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे.

सुरत महानगरपालिकतर्फे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी  विशेष प्रयत्न केले गेले. त्यामध्ये  घनकचरा व्यवस्थापन,  धूळीचे नियंत्रण, वाहन उत्सर्जनावर नियंत्रण, बांधकाम कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे,  औद्योगिक उत्सर्जन कमी करणे, जनजागृती मोहीम राबवणे, शहरामध्ये परिवहन सेवेसाठी तब्बल 580 इलेक्ट्रिक  बसचा वापर करणे  असे अनेक उपक्रम राबविले गेले. या उपक्रमात लोकसहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने  याचे फलित म्हणून  या सर्वेक्षणात सुरतला प्रथम क्रमांक मिळाला.

PGB/ML/PGB
5 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *