लखन भैय्या एन्काऊंटर, प्रदीप शर्माना दिलासा

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेल्या जन्मठेपच्या शिक्षेच्या आदेशाला पुढील निर्देश देईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात 2013 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषमुक्त केलं होतं. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल रद्द करत निर्णय देत त्यांना दोषी असल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता 8 एप्रिल 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देतस पुढचे निर्देश मिळेपर्यंत या आदेशाला स्थगिती कायम असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी आता सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी चार आठवड्यानंतर होईल. तोपर्यंत राज्य सरकारला या संदर्भातील उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे मांडावं लागेल. मात्र, तुर्तास प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा आणि शरण येण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
SW/ML/SL
8 April 2024