युनियन कार्बाईड कचरा विल्हेवाट सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

 युनियन कार्बाईड कचरा विल्हेवाट सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९८४ मध्ये भोपाळमध्ये हाहाकार माजवून हजारो लोकांचे जीव घेणाऱ्या युनियन कार्बाइड या केमिकल कंपनीचा विषारी कचरा अजूनही भोपाळमध्ये पडून आहे. भोपाळ वायुगळती प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाईड कंपनीच्या विषारी कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून सुरू असलेल्या वादावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील युनियन कार्बाईडचा विषारी कचरा २ जानेवारी रोजी १२ सीलबंद कंटेनरमधून धार जिल्ह्यातील पिथमपूरमध्ये नेण्यात आला आहे. पिथमपूरमध्ये हा कचरा जाळण्यात येणार आहे. मात्र या विषारी कचऱ्यामुळे किरणोत्सर्ग होण्याचा धोका असल्याने पिथमपूरवासियांनी कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावण्यास विरोध केला आहे. त्यासाठी पिथमपूरवासियांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.हा कचरा पिथमपूरमध्ये नेण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तुम्ही मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल करू शकता,असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.

SL/ML/SL

6 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *