प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच ग्रॅप-३ आणि ग्रॅप-४ चे नियम लागू करण्यासाठी तीन दिवस उशीर केल्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले.दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ४०० एक्यूआयच्याही पुढे होती. १२ नोव्हेंबरला प्रदूषणाची स्थिती धोकादायक पातळीवर पोहोचली असताना तुम्ही ग्रॅप-४ चे नियम लागू करण्यासाठी तीन दिवस वाट का पाहात बसलात,असा सवाल न्यायालयाने केला. आता उशिराने लागू केलेले ग्रॅप-४ आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला मागे घेता येणार नाहीत,असेही न्यायालयाने बजावून सांगितले.

दरम्यान, प्रदूषणाचा निर्देशांक ४५० आयक्यूआयपर्यंत पोहोचल्यानंतर दिल्लीत ग्रॅप-४ लागू करण्यात आले. मात्र त्याचा काहीही सकारात्मक परिणाम आज दिसला नाही. उलटपक्षी आज सकाळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली. द्वारका आणि नजफगडसह अनेक ठिकाणी निर्देशांक ५०० आयक्यूआयपर्यंत वाढला. एनसीआर परिसरातील प्रदूषणाची स्थिती अशीच गंभीर आहे. नोईडामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३८४, गाझियाबादमध्ये ४००,गुरुग्राममध्ये ४४६ आणि फरीदाबादमध्ये ३३६ एक्यूआय नोंदविला गेला.

SL/ML/SL

18 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *