सर्वोच्च न्यायालयाने BMW ला लावला 50 लाखांचा दंड

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वाच्च न्यायालयाने बीएमडब्ल्यू कार बनवणाऱ्या बीएमडब्ल्यू इंडिया या कंपनीला मोठा दंड आकारला आहे. हे प्रकरण पंधरा वर्षे जुने आहे. या प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने बीएमडब्ल्यू कंपनीला 50 लाखाची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण तेलंगणा राज्यातील आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीवर एका ग्राहकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या सुनवाणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण 15 वर्षे जुने आहे.
हैदराबादच्या एका ग्राहकाने 2009 मध्ये बीएमडब्ल्यू कार विकत घेतली. त्यानंतर ते ती कार घेवून घरी निघाले होते. पण ती कार वाटेतच बिघडली. पुन्हा कार कंपनीकडे दिली गेली. त्यांनी ती दुरूस्त करून दिली. पण पुढील तिन महिन्यात पुन्हा कार बिघडली. त्यामुळे ग्राहकाने कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शिवाय हैदराबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने या केसची सुनावणी केली. शिवाय ग्राहकाला नवीन कार देण्याचे आदेश दिले. कंपनीनेही उच्च न्यायालयाचे आदेश मान्य केले. शिवाय नवीन कार देण्याची तयारी दर्शवली.
मात्र ग्राहकाला ते मान्य नव्हते. त्याने या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचुड, न्यायाधिश जे. बी. परदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या समोर झाली. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत. ग्राहकाला नुकसान भरपाई बीएमडब्ल्यू कंपनीने देणे गरजेचे आहे. त्यानुसार 50 लाख रूपयांची भरपाई कंपनीने ग्राहकाला द्यावी असा आदेश दिले. हे फायनल सेटेलमेंट असेल. हे पैसे कंपनीने ग्राहकाला 10 ऑगस्टच्या आत द्यावेत असे आदेशही दिले आहेत.
SL/ML/SL
14 July 2024