NEET UG 2024 फेरपरीक्षा होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

 NEET UG 2024 फेरपरीक्षा होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET UG 2024 परीक्षेबाबत गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या गदारोळात विविध गैरप्रकार उघडकीस आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पुढाकार घेत. निकाल पारदर्शक लागावा यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत . त्यानंतर आता नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत पेपरफुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याचेही न्यायालयाने सांगितल. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. देशभरात ५ मे रोजी ‘नीट-यूजी’ची प्रवेश परीक्षा झाली होती, त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षार्थींना गुण वाढवून देणे आणि तोतयागिरी यासह गैरप्रकार झाल्याचे आरोप करणाऱ्या ४०पेक्षा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी झाली.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी निकाल देताना सांगितले, नॅशसनल टेस्टिंग एजन्सी आणि आयआयटी मद्रासने दिलेला अहवाल तपासल्यानंतर लक्षात येते की, पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती फार मोठी नाही किंवा हे प्रकरण फार व्यापक नाही. “सध्या आपल्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे पेपरफुटी प्रकरण हे सुनियोजित पद्धतीने राबवविले गेले, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे परीक्षेचे पावित्र्य भंग झाले, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही”, असेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.

या सुनावणीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ‘नीट-यूजी’चे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने शहरनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल शनिवारी (दि. २०) आपल्या संकेतस्थळांवर जाहीर केले. त्यातील तपशिलांनुसार, भरघोस गुण मिळाल्यानंतर फेरपरीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी तितकीशी चांगली नसल्याचे आढळले आहे.

SL/ML/SL

23 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *