दत्तक प्रक्रियेतील विलंबाची दखल घेत न्यायालकाकडून सुमोटो याचिका

 दत्तक प्रक्रियेतील विलंबाची दखल घेत न्यायालकाकडून सुमोटो याचिका

मुंबई, दि. १० : देशात तीन हजार मुलांना दत्तक घेण्यासाठी सुमारे ५५ हजार पालक प्रतीक्षेत आहेत. यामुळेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो, अशी माहीती समोर आल्याने खंडपीठाने स्वत: दखल घेऊन दाखल केलेली सुमोटो याचिकाच निकाली काढली. मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास वर्षानुवर्षे वाट पहावी लागत असल्याचा अहवाल एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला.पालकांना सरासरी साडेतीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे उघड झाले. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी स्यूमोटो याचिका दाखल करून घेतली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्याने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही याचिका मागे घेण्यात यावी असा सल्ला खंडपीठाला दिला. तो मान्य करत मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी ही याचिका निकाली काढली.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने मागिल सुनावणीच्यावेळी गंभीर दखल घेत ज्येष्ठ वकील ॲड.मिलिंद साठे व ऍड गौरव श्रीवास्तव यांची अमायकस क्यूरी (न्यायालयीन मित्र) म्हणून नियुक्ती तसेच केंसरकार, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणा सह अन्य प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार अमायकस क्युरीनी (न्यायालयीन मित्र) दिलेल्या माहिती नुसार देशात ३ हजार दत्तक मुलांसाठी ५५ हजार जोडपी आहेत.

Suo moto petition filed by court

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *