सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईम केल्याचे मिळणार फक्त एक लाख रूपये, पण पगार किती मिळणार हे वाचाच

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी पहाटे पृथ्वीवर परतले. मात्र, इतके महिने राहून त्यांना मिळणारा भत्ता हा अगदीच कमी आहे. त्यांच्या अंतराळातील राहणीमानासाठी प्रतिदिन 347 रुपये (4 डॉलर्स) अतिरिक्त वैयक्तिक भत्ता मिळेल. याचा अर्थ, त्यांच्या या 287 दिवसांच्या अंतराळ मुक्कामासाठी दोघांनाही प्रत्येकी 1,148 डॉलर्स (अंदाजे 1 लाख रुपये) जास्त मिळणार आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना GS-15 वेतन श्रेणी मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे, जी अमेरिकन सरकारच्या जनरल शेड्यूल (GS) प्रणालीतील सर्वोच्च पातळी आहे. या श्रेणीतील अधिकृत पगार $1,25,133 ते $1,62,672 पर्यंत असतो. म्हणजेच, त्यांच्या 9 महिन्यांच्या अंतराळ मुक्कामादरम्यान, त्यांचा एकूण पगार 81 लाख रुपये ते 1.05 कोटी रुपयांदरम्यान असणार आहे.