अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अंतराळातून धक्कादायक माहिती
मागील जून महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत, त्यांचे वजन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अंतराळातून स्वतचा फोटो पाठवला आहे. त्यातून त्यांच्या प्रकृतीचा अंदाज येतो. या फोटोत सुनीता अंत्यत सडपातळ झालेली दिसत आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने अफवांना लगाम बसला आहे.सुनीता विल्यम्स म्हणाल्या,’मला वाटते की माझ्या शरीरात थोडा बदल झाला आहे, पण माझे वजन तेच आहे. माझे वजन कमी होत असल्याच्या अफवा आहेत. माझे वजन अंतराळात येताना जेवढे होते तेवढेच आताही आहे.’ एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतः सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.